प्रेरणादायी भाषणे

     बालकवी

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे ----या कवितेचे रचनाकार 

#मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो असे

*त्र्यंबक बापूजी ठोंबरे* यांचे आज पुण्यस्मरण ५ मे १९१८. 

१९०७ च्या जळगाव येथील कवी संमेलनात त्यांना ’बालकवी’ ही पदवी मिळाली. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी ठोंबऱ्यांना बालकवी ही पदवी दिली.बालकवींच्या बहुतेक कवितांत निसर्ग मध्यवर्ती असला तरी रूढ अर्थाने निसर्गवर्णन हा त्यांच्या कवितांचा हेतू नाही. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे ते सहजोद्गार आहेत. निसर्गातील विविध दृश्यांत त्यांना मानवी भावना दिसतात. बालकवींच्या एकूण कवितेमध्ये उदासीनता व्यक्त करणाऱ्या बारा-तेरा तरी कविता आहेत. कविबाळे, पाखरास, दुबळे तारू, यमाचे दूत, निराशा, पारवा, शून्य मनाचा घुमट, काळाचे लेख, खेड्यातील रात्र, संशय, हृदयाची गुंतागुंत, जिज्ञासू, बालविहग ह्या कविता त्यांपैकीच होत.

आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे || धृ.||

वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे

नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला

मोद विहरतो चोहिकडे || १ ||

सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे

खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे

मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले

इकडे, तिकडे, चोहिकडे || २ ||

नीलनभी नक्षत्र कसे, डोकावुनि हे पाहतसे

कुणास बघते ? मोदाला; मोद भेटला का त्याला ?

तयामधे तो, सदैव वसतो, सुखे विहरतो

इकडे, तिकडे, चोहिकडे || ३ ||

वाहति निर्झर मंदगती, डोलति लतिका वृक्षतती

पक्षी मनोहर कूजित रे, कोणाला गातात बरे ?

कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले

इकडे, तिकडे, चोहिकडे || ४ ||

स्वार्थाच्या बाजारात, किती पामरे रडतात

त्यांना मोद कसा मिळतो, सोडुनि स्वार्था तो जातो

द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला

इकडे, तिकडे, चोहिकडे || ५ ||

“श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे ।

क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे।।

“वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे;

मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे!

“झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा! तो उघडे ।

तरूशिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे ।।

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा ।

सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा!

“बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते ।

उतरूनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते ।।

“फडफड करूनी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती ।

सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती ।।

खिल्लारे ही चरती रानीं, गोपही गाणी गात फिरे ।

मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरे ।।”

अभिवादन "

**************************************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कहाणी एका जिद्दीची

   कहाणी एका जिद्दीची              पी. डी. कासुर्डे. नाम ही काफ़ी है !!! जिद्द, चिकाटीचं दुसरं नाव म्हणजे पी. डी. 🍀             ज्यानं मराठ...