कहाणी एका जिद्दीची
पी. डी. कासुर्डे. नाम ही काफ़ी है !!! जिद्द, चिकाटीचं दुसरं नाव म्हणजे पी. डी. 🍀
ज्यानं मराठी टेलिव्हीजनच्या इतिहासात पहिल्यांदा💥 *पन्नास लाख * 💥एवढी घसघशीत रक्कम जिंकली !!! तिही केवळ जिद्द आणि चिकाटीच्या बळावर !! तेव्हा वय होतं चाळीस.
नंतर त्याच शोसाठी पाच वर्ष क्विझमास्टर म्हणून काम केलं ..!!
वय वर्ष ५० !! खरंतर निवृत्तीचे वेध लागणार वय!! ✨नवं काहीतरी सोडाच ..
आहे तेच व्यवस्थित करतोय की नाही याची भ्रांत पडणारं वय !! 🌺
पण चला चेक करुया आपला मेंदू पुर्वी इतकाच काम देतोय की नाही ते पाहण्यासाठी बाबाने एक लाख एक हजार विद्यार्थ्यांसोबत SET दिली. सेटचा निकाल ६% लागतो. ९४ हजारांना मागे रेटत पी. डी. क्वालिफाय झाला !!!✨✨
त्याला विचारलं , तुला हे कसं जमतं? तर तो सांगतो..टिच्चून अभ्यास !! यशाला शॅार्टकट नसतो !!🌏
पॅालिटिक्स सारख्या विषयात सेट करुनही पॅालिटिक्स पासून चार हात दूर असणाऱ्या आमच्या या मित्रास लक्ष लक्ष शुभेच्छा !!!🌺💐🌺💐🌺💐🌺💐🌺💐
श्री पोपट कासुर्डे सर यांनी सेट परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल शिक्षकांचे पंचप्राण,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते मा.संभाजीराव थोरात (तात्या ) यांच्या हस्ते सत्कार करताना शिक्षक संघाचे शिलेदार.